शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह गुटखा पकडला; एकाच्या मुसक्या आवळल्या, लातूरच्या वलांडी-बाेंबळी मार्गावर सापळा

By राजकुमार जोंधळे | Updated: April 12, 2025 11:49 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजकुमार जाेंधळे, लातूर : चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून वाहन, गुटखा असा ८ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री केली. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाईचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाकडून अवैध व्यवसायावर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, वलांड (ता. देवणी) शिवारातून एका वाहनातून गटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने वलांडी ते बाेंबळी मार्गावर गुरुवारी रात्री ८ वाजता सापळा लावला. एक संशयीत कार पाेलिसांनी पकडली. झाडाझडती घेतली असता त्यामध्ये ३ लाख १२ हजारांचा गुटखा आढळून आला. यावेळी एकाला अटक केली आहे. चाैकशी केली असता त्याने बस्वराज विश्वनाथ आग्रे (वय ४४, रा. हालसी, ता. निलंगा) असे नाव सांगितले.

याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर