वलांडी : ग्रीन वलांडी मोहिमेंतर्गत शुक्रवारी येथे मियावाकी पद्धतीने एक हजार रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
वलांडी पोलीस चौकीच्या प्रांगणात गतवर्षी मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या रोपांची चांगली वाढ झाली आहे. आता नवीन एक हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. आपल्या आरोग्यासाठी जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे तसेच दरवर्षी नवीन रोपांची लागवड करण्याची संकल्पना घेऊन वलांडीत वृक्ष लागवड व संवर्धनाची ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक कामठेवाड, शिनगारे, सरपंच राणीताई भंडारे, उपसरपंच प्रा. महेमुद सौदागर, रामभाऊ भंडारे, आदी उपस्थित होते. सरपंच राणीताई भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.