शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिटोसीन इंजेक्शन आता थेट डॉक्टरांना मिळणार; मेडिकलवरील खुली विक्री होणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:29 IST

बाळंतपणासाठी वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर काही शेतकरी पशुधनामध्ये दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हे इंजेक्शन आता थेट स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. 

- हरी मोकाशे 

लातूर : बाळंतपणासाठी वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर काही शेतकरी पशुधनामध्ये दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हे इंजेक्शन आता थेट स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. 

ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना पशुधनाचे दूध वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या औषधासंदर्भात माहिती नसते. पशुवैद्यकीय दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध ते आणत असतात. काही मेडिकल दुकानदार हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून आॅक्सिटोसीन इंजेक्शन देतात. हे शेतकरी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कम्पाऊंडरमार्फत आपल्या पशुधनास अशाप्रकारचे इंजेक्शन देत असतात, हे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारीही दाखल झाल्या होत्या. वास्तविक आॅक्सिटोसीन इंजेक्शन हे महिलांच्या बाळंतपणाच्या कालावधीत वापरले जाते. मात्र खाजगी मेडिकल दुकानदार त्याचा गैरवापर करीत पशुधनाचे दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे आढळले आहे. परिणामी, पशुधनाचे दूध वाढत असले तरी या दुधामध्ये काही घटक उतरून ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा प्रकारे होणारा गैरप्रकार थांबावा, यासाठी केंद्र सरकारने नवे पाऊल उचलत सदरील इंजेक्शन हे आता मेडिकल दुकानावर विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. शासनाची कंपनी करणार उत्पादन  आॅक्सिटोसीन इंजेक्शनची निर्मिती ही आता शासनाची कंपनी करणार आहे. येत्या १ सप्टेंबरपासून हे इंजेक्शन मेडिकल दुकानांवर विक्री करता येणार नाही. स्त्री रोग तज्ज्ञांना थेट कंपनीकडूनच मागवावे लागणार आहे. यासंदर्भात स्त्री रोग तज्ज्ञांना माहिती देण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त किशोर चांडक यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंdoctorडॉक्टर