शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

सर्वोत्कृष्ठ कार्य करणारेच पुरस्कारासाठी पात्र ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूरच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील शाहू भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत ...

शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूरच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील शाहू भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमास संस्था सचिव प्राचार्य अनिरुध्द जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, अॅड. सुनिल सोनवणे, सदस्य ॲड. एस. टी. मनाळे, महादेव मुळे, आनंद माने, बब्रुवान गोमसाळे, डॉ. सुहास गोरे, प्रा. प्रकाश देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, मुख्याध्यापक डॉ. सुवर्णा जाधव, मुख्याध्यापक मीना बिराजदार, श्रीमती थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेत काम करणाऱ्या विविध शाखेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाहू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा हा पुरस्कार राजर्षी शाहू महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. कांचनप्रभा मस्के, सेवक धनू राठोड, जिजामाता कन्या प्रशालेतील कल्पना जाधव, यशवंत विद्यालयातील मनीषा पाटील यांना प्रदान करण्यात आला. देशमुख म्हणाले, शिक्षण संस्थेने गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व साधने उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. मात्र अशा साधनांचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे केला तर त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते, असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक करताना संस्था सचिव प्राचार्य अनिरुध्द जाधव यांनी पुढील वर्षापासून शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत असणाऱ्या सर्वच शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या पुरस्कार देण्यात यावेत, विनाअनुदानित तत्वावर आणि कमी सेवा असणाऱ्या प्राध्यापक आणि शिक्षकांनाही शाहूभूषण पुरस्कार देण्याबाबत संस्थापातळीवर विचार सुरु आहेत. कोणत्याही संस्थेत शिक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी व्यवस्थापनाबरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी या घटकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, असे विचार त्यांनी मांडले.

यावेळी डॉ. कांचनप्रभा मस्के यांनी महाविद्यालयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंढरीनाथ शिंदे यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यासाठी संस्थेला एक लाख रुपये देणगी प्रदान केली. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संशोधन विभागामार्फत शोध लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाहू भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारर्थींचा परिचय प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, संतोष गुरव यांनी करुन दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रमितेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. सूत्रसंचालन, आभार डॉ. अनुजा जाधव, डॉ. प्रीती पोहेकर यांनी मानले.