११८२९ पुस्तके परत
सर्व शिक्षा अभियानाने गतवर्षी वितरीत केलेली पुस्तके पुनर्वापरासाठी शाळेत परत करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
या आवाहनानुसार ११८२९ पुस्तके जमा करण्यात आली आहेत. नवे पुस्तके वितरीत होताना या पुस्तकांचाही वापर केला जाणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असून, मुलांना वेळेत पुस्तके दिली गेली नाहीत. बालभारतीकडून वाटपाचा कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानाला आला नाही.
पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार?
शाळेतून पुस्तके मिळणार असल्यामुळे पुस्तकं घेतली नाहीत. शाळाही भरत नाही. ऑनलाइन वर्ग आहेत. पुस्तकं नसल्यामुळे अभ्यासही करता येत नाही. ऑनलाइन वर्गामध्ये कोणता धडा शिकविला जातो, तेही पुस्तके नसल्यामुळे कळत नाही. - रिहान ठेंगाडे
ऑनलाइन शाळा आहे. परंतु, पुस्तकं नाहीत. त्यामुळे वाचन होत नाही. शाळेत असताना सर फळ्यावर लिहून देत होते. आता ऑनलाइन वर्ग असल्यामुळे तेही शक्य नाही. त्यामुळे अभ्यास कसा करावा, असा प्रश्न आहे. - तृप्ती लोंढे
बालभारतीला जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांची नावे कळविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून अद्याप पुस्तक वितरणाचा कार्यक्रम आला नाही. आमच्याकडून पुस्तक वाटपाची पूर्ण तयारी आहे. बालभारतीकडून पुस्तके मिळताच त्याचे तत्काळ वितरण केले जाईल. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी