शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 21:55 IST

लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत

राजकुमार जाेंधळे

केळगाव (जि. लातूर) : भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जण जागी ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-जहिराबाद महामार्गावर लांबाेटा माेड येथे शनिवारी सायंकाळी घडली. सतीश अनंत कांबळे (वय ५५) असे अपघातातील मयताचे नाव आहे.

निलंगा तालुक्यातील शिरोळ (वांजरवाड) येथील सतीश अनंत कांबळे आणि संजय दौलत कांबळे हे दोघे जण दुचाकीवरुन निलंगा येथून शिरोळ गावाकडे शनिवारी सायंकाळी येत हाेते. दरम्यान, लांबोटा माेडवरील एका हॉटेलसमोर भरधाव कारने (एम.एच. २४ बी.एल. ४१८६) विरुद्ध दिशेला येत दुचाकीला जोराने उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोघे उडून रस्त्यावर पडले. यात सतीश कांबळे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. साेबतचा अन्य एक गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ...लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. शिवाय, रस्त्याला भेगाही पडल्या असून, या भेगा चुकवण्यासाठी वाहनधारक विरुद्ध दिशेने वेगात वाहन चालविताता. यातच अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघाताची माहिती निलंगा पोलिस समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल हाेत पाहणी केली.

महामार्गाला गेले तडे; चालकांचा जीव धाेक्यात...लातूर-जहिराबाद महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या तड्यामुळे दुचाकी चालकांचा जीव धाेक्यात आला आहे. दुचाकीचे टायर लहान आकाराचे असल्याने भेगात ते अडकत आहेत. शिवाय, लहान कार, दुचाकीचे टायर स्लिप होऊन फुटत आहेत. यातून भीषण अपघात हाेत आहेत. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात