शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जुन्या भांडणाची कुरापत काढून तरूणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:07 IST

तपासासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त

ठळक मुद्देएकास अटक, सात जणांवर गुन्हा

शिरूर अनंतपाळ  (जि़लातूर) : जुन्या भांडणाची कुरापत काढून बस स्थानकावर बोलत थांबलेल्या राजेंद्र रघुनाथ जाधव (३४) या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे सोमवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितले, शिरोळ वांजरवाडा येथील बसस्थानकानजिकच्या एका हॉटेल समोर फिर्यादी प्रसाद जाधव आणि राजेंद्र रघुनाथ जाधव (३४) हे दोघे चुलतभाऊ सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास बोलत थांबले होते. यावेळी सुरेश दिलीप जाधव याने गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या भांडणाची कुरापत काढली़ यावेळी गणेश दिलीप जाधव, संतोष दिलीप जाधव, विक्रम विश्वास जाधव, विश्वास रावसाहेब जाधव, दिलीप रावसाहेब जाधव, भरत रावसाहेब जाधव (सर्व रा़ शिरोर वांजरवाडा) यांनी भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रसंगी राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या पाठीत हातातील चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, राजेंद्र जाधव यास उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रसाद जाधव यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांविरूद्ध कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सुरेश दिलीप जाधव यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे़ अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

तपासासाठी दोन पथके रवाना...याप्रकरणातील सात पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी परमेश्वर कदम यांनी तपासासाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. उर्वरित सहा आरोपींचा शोध घेण्यात येत असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पो.नि. कदम यांनी दिली.  

टॅग्स :MurderखूनlaturलातूरCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस