शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप; खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय !

By हणमंत गायकवाड | Updated: June 29, 2024 14:01 IST

‘नीट’ प्रकरणामुळे प्रमाणपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर

लातूर : अपंग, दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरीसह पदोन्नती आणि प्रवासी सवलत खऱ्या लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी बोगस प्रमाणपत्र लाटणाऱ्यांनाच मिळत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. या अनुषंगाने प्रहार अपंग क्रांती संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त आहेत.

नीट प्रकरणात आरोपी असलेल्या जलीलखाँ पठाण यानेही सादर केलेल्या प्रमाणपत्रावर संघटनांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. परंतु, यानिमित्ताने खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळतो का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून लातूर तालुक्यातील १७८१ व्यक्तींनी अपंग प्रमाणपत्र काढले आहे. स्वावलंबन कार्ड याअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळते. ४० टक्क्यांच्या पुढे दिव्यांग अथवा अपंग असल्यास नोकरीत तसेच पदोन्नतीमध्ये सवलत आहे. रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या बसेससाठी तिकिटात २५ टक्के सवलत आहे. या सवलती लाटण्यासाठी अनेकजण बोगस प्रमाणपत्र काढतात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार प्रमाणपत्र दिले जात असल्यामुळे त्याला बोगस कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. परंतु, अपंगांच्या पुनर्वसनासंदर्भात काम करणाऱ्या संघटनांकडे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सवलती लाटणाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. परंतु, त्यांची चौकशी होत नाही. विलंब लागतो. त्याचेच एक ताजे उदाहरण नीट प्रकरणातील आरोपी जलीलखाँ पठाण याचे आहे. एका संघटनेने त्याच्या प्रमाणपत्राबाबत तक्रार केली. चौकशी झाली. मात्र ज्या एजन्सीने प्रमाणपत्र दिले, त्या एजन्सीकडे प्रमाणपत्र पडताळणीला गेले आहे. ती एजन्सी स्वत:च्या प्रमाणपत्राला चुकीचे कसे ठरवील?

खऱ्यांना लाभ मिळत नाहीजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आहे. स्वावलंबन कार्डअंतर्गत ही नोंदणी होते. यूआयडी नंबरचे कार्ड बोगस बनविले जाते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना अपंग प्रमाणपत्राचा लाभ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख म्हणाले.

बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट?काेणताही एक उद्याेग ‘नीट’ न करणाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र काढून देण्यासाठी काेणाकाेणाला गंडवले का? याचा शाेध पाेलिस आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून घेतला जात आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांचे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात तथ्य आढळले तर गडबड करून प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना चाप बसेल आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळेल.

टॅग्स :laturलातूरDivyangदिव्यांग