शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी !

By संदीप शिंदे | Updated: May 26, 2023 16:37 IST

मुदतवाढ देऊनही १०५० विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यात १६६९ जागा असून, राज्यस्तरीय सोडतीमध्ये १६४८ जणांची सोडत लॉटरी निघाली. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २२ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असून, आतापर्यंत केवळ १०५० प्रवेश झाले आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

आरटीईसाठी जिल्ह्यात २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा असून, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सोडतीमध्ये १६४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, यातील १ हजार ५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेश निश्चितीसाठी २२ मे ही तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मनासारखी शाळा न मिळणे, घरापासून शाळा दुर असणे आदी कारणांमुळे काही पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे उर्वरित ६१९ जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. याबाबत पुणे येथूनच पालकांना मार्गदर्शक सुचना देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

तीन वेळेस मुदतवाढ देऊनही दुर्लक्ष...पुणे येथे ५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय सोडत निघाली. त्यानंतर १२ एप्रिलपासून पालकांना निवडीचे संदेश पाठविण्यात आले. २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रे पडताळणी करुन, ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र, पालकांच्या मागणीनुसार ८ मे पर्यंत मुदत दिली. त्यानंतर तिसऱ्यांदा २२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीनवेळेस मुदतवाढ देऊनही पालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, ६१९ जागांवरील प्रवेश अद्यापही रखडलेलेच आहेत.

प्रतीक्षा यादीतील पालकही संभ्रमात...शिक्षण विभागाकडून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. आरटीईमध्ये प्रतीक्षा यादीत नाव असल्याने काही पालकांनी इतर शाळेत मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. आता त्यांना आरटीईअंतर्गत प्रवेशाचा संदेश आला तर जुना प्रवेश रद्द करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या मार्गदर्शक सुचना लवकर जाहीर करण्याची मागणी पालकांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा