आषाढात शुभ तारखा
पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, आता सुविधा वाढलेल्या आहेत. त्यामुळे गौण काळातही विवाह सोहळे करता येऊ शकतात. लोकांची सोय व्हावी म्हणून जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन लग्न तिथीच्या तारखा तज्ज्ञांनी दिल्या आहेत. काळानुरुप बदल स्वीकारला पाहिजे. - अघोर महाराज
चातुर्मासामध्ये विवाह करू नये, असे कुठल्याच ग्रंथात नमूद नाही. पाऊस काळ अधिक सुविधा कमी असल्यामुळे आषाढात विवाह होत नव्हते. चिखल मातीची घरे होती. त्यामुळे सुविधा नव्हत्या. परंतु, आता सुविधा वाढल्या आहेत. आपत्कालीन सोय म्हणून पंचांगातही तारखा दिलेल्या आहेत. - राजाभाऊ सेलूकर महाराज
परवानगी ५० चीच, पण
कोरोनामुळे मर्यादित संख्येत विवाह सोहळे उरकण्यात येत आहेत. गत उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा जिल्ह्यात कहर होता. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत. आता काही वधू-वर पालक आषाढातही विवाह उरकत असून, कोरोनाचा आणखी संसर्ग सुरू असल्याने फक्त ५० व्यक्तींनाच विवाह सोहळ्याला उपस्थित राहता येत आहे.
मंगल कार्यालये बुक
वधू-वर पालक घरच्या घरी विवाह सोहळे उरकत असल्याने मंगल कार्यालयांना यंदाच्या हंगामात तोटा सहन करावा लागला.
एप्रिल, मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होता. प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले होते. लोक कोरोनामुळे भयभीत झाले होते. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत.
आता आषाढ सुरू असून, गौण विवाह मुहूर्त असल्याने तीन-चार तारखा बुक झाल्या आहेत, असे मंगल कार्यालयाचे संचालक देशमुख यांनी सांगितले.