जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ४२ हजार २४९, बीपीएल ८५ हजार ७३६, केशरी २ लाख ४४ हजार ६३३, एपीएल शेतकरी योजना ६६ हजार ३२२ तर एपीएल केशरी योजनेचे ५० हजार १४३ कार्डधारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुकारण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद आहे. त्यांची परवड होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्यावतीने एपीएल केशरी वगळता सर्व कार्डधारकांना धान्य वितरित केले आहे. मात्र, यामध्ये काही ठिकाणी धान्य शिल्लक उरलेले आहे. त्यामुळे शिल्लक असलेले धान्य एपीएल केशरी कार्डधारकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण कार्डधारक - ४,८९,०८३
अंत्योदय - ४२,२४९
बीपीएल - ८५,७३६
एपीएल केशरी - ५०,१४३
काय मिळणार -
प्रति किलाे दर
गहू - ८ रुपये किलो
तांदूळ - १२ रुपये किलो
जिल्ह्यात पावणेपाच लाख कार्डधारक...
जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार ८३ कार्डधारक आहेत. यामध्ये अंत्योदय ४२ हजार २४९, बीपीएल ८५, ७३६, केशरी २ लाख ४४ हजार ६३३, एपीएल शेतकरी ६६ हजार ३२२ तर एपीएल केशरीचे ५० हजार कार्डधारकांचा समावेश आहे. संचारबंदीमुळे एपीएल केशरी वगळता सवृ लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, या योजनेमुळे एपीएल केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध हाेणार आहे. जून महिन्याकरिता याची अंमलबजावणी होईल.
संचारबंदीच्या काळात धान्यामुळे गरजूंना मदत...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाच्यावतीने धान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे गरजूंना लाभ झाला आहे. आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यापासून सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे.
कोट...
जिल्ह्यात स्वस्त धान्य दूकानाच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. जून महिन्यात एपीएल केशरी कार्डधारकांना धान्य वितरित करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पुरवठा विभागाच्यावतीने तयारी केली जात आहे. सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ दिले जाणार आहे. यामुळे अनेकांना मदत होईल.