शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

लातूरकरांना नवीन करवाढ नाही, मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून दुप्पट करवसुली

By हणमंत गायकवाड | Updated: March 3, 2023 17:20 IST

लातूर मनपाचे ६८.६७ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक

लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी ६८.६७ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. नागरिकांसाठी कसलीही करवाढकरता अधिक चांगल्या सुविधा देण्याचा लातूर मनपाचा प्रयत्न असेल, त्यानुषंगाने अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्त म्हणाले.

२०२३-२४ सालासाठी अपेक्षित जमा व अपेक्षित खर्च ग्राह्य धरून ६८.६७ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मांडले. यावेळी आयुक्तांनी गॅसदाहिनीसह नागरिकांसाठी विविध योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला. अंत्यविधीसाठी जे नागरिक गॅसदाहिनीचा वापर करतील, अशांच्या अंत्यविधीचा खर्च लातूर महानगरपालिका करणार असल्याचे आयुक्त म्हणाले. तसेच जननीरथ हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून गरोदर मातांना दवाखान्यात जाण्यासाठी या रथाचा उपयोग होणार आहे. या योजनेसाठी लातूर मनपाने प्रस्तुत अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. दरम्यान, कसलीही करवाढ केली नाही, पण ज्या नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, अशा दीडशे इमारतींचे लातूर मनपाने सर्वेक्षण केले असून त्यांच्याकडून दुप्पट करवसुली केली जाईल, असे आयुक्त म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, दिव्यांग सन्मान निधी, महिलांसाठी शहर बस सेवा, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम, ई-प्रशासन, नगर रचना विभागातील विविध योजना तसेच अमृत अभियान अंतर्गत विविध उपक्रम, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होत असलेल्या रस्त्यांची कामे आणि सोलार मंच बसविण्याबाबत या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. या सर्व योजना मार्गी लावण्यासाठी लातूर महानगरपालिका प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

जमाखर्चाची सर्वसाधारण आकडेवारी...अपेक्षित आरंभाची शिल्लक १५१.२४ कोटी, महसुली उत्पन्न १८५.६६ कोटी, असाधारण जमा ३६.५९ कोटी, कर्ज व निधी ३१.०० कोटी, विविध शासकीय कल्याणकारी योजना २२.८८ कोटी, भांडवली जमा ११५.७१ कोटी, केंद्र शासनाचे अनुदान ११३.०५ कोटी, एकूण शिलकेसह अपेक्षित जमा ६५६.०३ कोटी असल्याचे आयुक्त मनोहरे यांनी सांगितले. तर अपेक्षित खर्चामध्ये महसुली खर्च २१७.३८ कोटी, असाधारण खर्च ४५.९४ कोटी, कर्ज व निधी ३१.०० कोटी, विविध शासकीय कल्याणकारी योजना २५.८८ कोटी, भांडवली खर्च १८७.९० कोटी, केंद्रशासन अनुदानातून खर्च १४७.२४ कोटी, एकूण अपेक्षित खर्च ६५५.३४ कोटी असणार आहे.

टॅग्स :laturलातूरTaxकर