डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी ६ वाजता क्रीडा संकुल येथे निर्भया मॉर्निंग वॉक करण्यात आला. सुरुवातीला ''आम्ही प्रकाश बीजे'' हे चळवळीचे गीत सामूहिकपणे घेण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कोविड आजाराच्या सुरक्षेची खबरदारी घेतली होती. ''वर्ष झाली आठ, सांगा आम्ही कुटवर पाहायची वाट, आम्ही वारस विवेकाचे, फुले - शाहू - आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर - पानसरे, जितेंगे लढेंगे हिंसा के खिलाफ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते व युवकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संघटीतपणे आणि कृतिशीलतेने पुढे नेणे ही आमची जीवनधारणा राहील, असा निर्धार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव बाबा हलकुडे यांनी केले. शहर कार्याध्यक्ष दशरथ भिसे यांनी आभार मानले.
दिलीप आरळीकर, सुनीता आरळीकर, अजित निंबाळकर, अनिल दरेकर, सुधीर भोसले, उत्तरेश्वर बिराजदार, अजय सूर्यवंशी, डी. एन. भालेराव, विद्यासागर काळे, रामचंद्र तांदळे, पांडुरंग देडे, ज्योती ढगे, शकुंतला ढगे, संजय व्यवहारे, बबिता साळुंखे, एस. एन. दामले, गोकुळ राठोड, देवराज लंगोटे, परमेश्वर बडगिरे, रमेश वेरुळे, जयश जाधव, संजय मोरे आदी मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी झाले होते.
सूत्रधार का सापडत नाही, प्रधान सचिव बावगे यांचा सवाल
निर्ढावलेल्या प्रमाणे विचारवंतांचे खून महाराष्ट्रात होत आहेत. सूत्रधार मात्र मोकाटपणे फिरत आहेत. शासन व तपास यंत्रणा गांभीर्याने घेत नाही. डॉ. दाभोलकर यांचा खून होऊन आठ वर्षे पूर्ण झाली. परंतु अद्याप सूत्रधार तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. शासन खुनाचा तपास करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आरोपी अटककेत, पण सूत्रधार का अटक होत नाही, तो का सापडत नाही, असा सवाल अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी यावेळी केला.