शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिका निवडणूक पुढे ढकलली; विरोधकांसह सत्ताधारीही संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:35 IST

निलंगा नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते.

निलंगा (जि. लातूर) : उमेदवारी मागे घेण्यास मुदत न मिळाल्याने रेणापूर पाठोपाठ निलंगा पालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आता दुबार प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, उदगीरमध्येही तीन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया पुढे गेली आहे.

निलंगा नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. परंतु, मतदानाच्या १२ तास आधी आयोगाने स्थगितीचा निर्णय कळविल्यानंतर निलंग्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), काँग्रेस तसेच उद्धव सेना, वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी बंद पुकारला आहे.

निवडणूक पुढे ढकलल्याचा आयोगाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मतदान अधिकारावर गदा आणणारी ही कृती लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली. तर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचा हिरमोड झाला आहे.

औसा, अहमदपूर, उदगीरमध्ये मतदानऔसा, अहमदपूर आणि उदगीरमध्ये तीन प्रभागातील तीन जागा वगळता या तीनही नगरपालिकात अध्यक्षपद आणि नगरसेवकांसाठी मंगळवारी मतदान झाले.

नवीन अर्ज भरता येणार नाहीनव्या निवडणूक कार्यक्रमानुसार काही प्रभागात नामनिर्देशनपत्र मागे घेण्यापासूनच ही प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कोणालाही नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होईल.

खर्चावर पाणी?मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांच्या झालेल्या खर्चावर एकप्रकारे पाणी पडले आहे. त्यातही खर्च मर्यादा तीच राहील की नव्याने मुभा असलेली खर्च मर्यादा पूर्णपणे वापरता येईल, याबद्दल आयोगाकडून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढच्या २० दिवसांत आहे त्याच खर्च मर्यादेत प्रचार करायचे म्हटले तर तारेवरची कसरत होणार आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilanga Municipal Election Postponed 12 Hours Before Vote; Outrage Ensues

Web Summary : Nilanga's municipal election postponed due to nomination issues, sparking protests. Political leaders express discontent. Re-election process starts with nomination withdrawals. Voting now on December 20th, results on 21st. Candidates face financial strain within existing budget limits.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकlaturलातूर