शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हमिभावामुळे नाफेडला पसंती; लातुरात १० हजार शेतकऱ्यांकडून ८४ कोटींचा हरभरा खरेदी

By हणमंत गायकवाड | Updated: April 18, 2023 17:09 IST

नाफेडकडून १६ केंद्रांवर खरेदी : हमीभाव अधिक असल्याने शेतकऱ्यांची पसंती

लातूर : जिल्ह्यात नाफेडची १६ हमीभाव केंद्रे सुरू असून या केंद्रांवर १८ एप्रिल अखेरपर्यंत १० हजार ७६९ शेतकऱ्यांच्या एक लाख ५८ हजार १७९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. ८४ कोटी ३८ लाख ८७ हजार ६८५ रुपयांचा हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला यंदा चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती नाफेडकडे वाढली आहे.

जिल्ह्यामध्ये लातूरसह सेलू, मुरुड, अकोला, उदगीर, लोणी, औसा, चाकूर, रेणापूर, देवणी, अहमदपूर, शिरूर ताजबंद, सताळा, निलंगा-हालसी, शिरूर अनंतपाळ, जळकोट आदी १६ ठिकाणी हरभरा हमीभाव केंद्रे आहेत. या केंद्रांवर गेल्या महिनाभरापासून हरभऱ्याची खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत दहा हजार ७६९ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. एक लाख ५८ हजार १७९ क्विंटलची खरेदी झालेली आहे. यापैकी ५३ हजार ३१९ क्विंटल हरभऱ्याचे पेमेंट संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. २८ कोटी ४४ लाख ५९ हजार ५३२ रुपयांचे पेमेंट नाफेडला प्राप्त झाले आहे. त्यापैकी सात कोटी १७ लाख ९८ हजार ४३० रुपयांचे पेमेंट ४ एप्रिलपूर्वीच प्राप्त झाले आहे. सद्य:स्थितीत २१ कोटी २६ लाख ६१ हजार १०३ रुपयांचे पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दिली.

खरेदीपैकी ६०% पेमेंट शेतकऱ्यांना दिलेखरेदीपैकी ६० टक्के पेमेंट शासनाकडून प्राप्त झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. यंदा हरभऱ्याचा हमीभाव बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे एक लाखाच्या वर हरभऱ्याची खरेदी आतापर्यंत झालेली आहे. ११ जूनपर्यंत आणखीन खरेदीची मुदत आहे. त्यामुळे दोन लाख क्विंटलच्या वर खरेदी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नाफेडकडे हरभरा तेजीत; बाजारभाव कोमातहरभऱ्याला हमीभाव ५३३५ रुपये प्रति क्विंटल आहे. तर बाजारात पाच हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याला दर मिळत आहे. बाजारभावापेक्षा हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळत आहे . त्यामुळे यंदा हमीभाव केंद्राकडेच हरभऱ्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. दरम्यान, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाला बाजारभाव अधिक होता. त्यामुळे प्रस्तुत शेतमालाची विक्री हमीभाव केंद्रावर झाली नाही.

दहा दिवसांत पेमेंट ; ११ जूनपर्यंत केंद्र सुरू राहणारहमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत पेमेंट केले जात आहे. यंदा पेमेंटसाठी वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी झाली आहे. आणखीन ११ जूनपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे खरेदी वाढणार असल्याचे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर