गोविंद राम यादव (३८, रा. बोरफळ, ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, बोरफळ येथील आरोपी नितीन महादेव सुगावे याने आपल्या चुलत्यास नोकरीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून शुक्रवारी गोविंद यादव यास काठीने बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विकास यादव यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक केली.
घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी आरोपीस औसा न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.