शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी मित्राचा कुऱ्हाडीने घाव घालून खून; आरोपीला जन्मठेप

By राजकुमार जोंधळे | Updated: May 28, 2025 22:29 IST

लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

राजकुमार जाेंधळे / लातूर : पैशासाठी मित्राचा डाेक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्या आराेपी साेमनाथ राजेंद्र सगर याला जन्मठेप व पाच हजारांचा दंड, अशी शिक्षा लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी सुनावली.

सहायक सरकारी वकील व्ही. व्ही. देशपांडे यांनी सांगितले, आराेपी साेमनाथ राजेंद्र सगर (रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) याने मित्र श्रीकांत ऊर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे (रा. तत्तापूर, ता. रेणापूर) याच्याकडील काेथिंबीर विक्री करून आणलेली रक्कम बळकावण्याच्या उद्देशाने त्याच्या डाेक्यात, मानेनजीक कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. ही घटना २९ सप्टेंबर २०२० राेजी रात्री घडली. याबाबत गांधी चाैक ठाण्यात ओम चिल्लरगे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

मयत श्रीकांत ऊर्फ बबलू चिल्लरगे याने नागपूर येथे काेथिंबीर विक्रीसाठी पिकअप वाहन घेऊन गेला हाेता. काेथिंबीर विक्री करून त्या काेथिंबिरीची पट्टी आणि रक्कम घेऊन लातूर येथे आला. लातूर येथे आराेपी, मयत आणि इतर साक्षीदारांनी सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला एका पाण्याच्या प्लांटच्या बाजूच्या खाेलीत २९ सप्टेंबर २०२० राेजी रात्री पार्टी केली. त्या खाेलीमध्ये मयत श्रीकांत आणि आराेपी साेमनाथ सगर झाेपले हाेते. पैसे बळकावण्याच्या उद्देशाने आराेपी साेमनाथ सगर याने श्रीकांत चिल्लरगे याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालत गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर साेमनाथजवळ असलेले पैसे घेऊन ताे पुणे येथे पळून गेला. पुणे येथे समाधान लाॅजवर मुक्कामाला हाेता.

दरम्यान, आराेपी साेमनाथ हा पुणे येथे असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर पाेलिसांनी पुण्यातील समाधान लाॅजवरून आराेपीला अटक केली. त्याच्यासाेबत असलेल्या पिशवीत नागपूर येथे विक्री केलेल्या काेथिंबीरची पट्टी व राेकड आढळून आली. यात लाॅज व्यवस्थापक, ज्या खासगी वाहनाने आराेपी पुणे येथे गेला ताे वाहन चालक, डाॅक्टरांचे जबाब नाेंदविले. इतर साक्षीदारांची साक्षही महत्त्वपूर्ण ठरली. दाेषी आराेपी साेमनाथ सगर याला जन्मठेप, पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.