शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपीस तीन वर्षांचा कारावास

By राजकुमार जोंधळे | Updated: November 29, 2022 17:41 IST

लातूर न्यायालयाचा निकाल; चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील प्रकरण

लातूर : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी (पाेस्काे) नळेगाव येथील आराेपीला तीन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे एका अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चाकूर पाेलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०२० रोजी रहीम इब्राहिम तांबोळी-शेख (वय ३८, रा. नळेगाव, ता. चाकूर) यांच्याविराेधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३८ / २०२० कलम ३५४, (ए) ४५२, ५०६ भादवी आणि ७, ८, ९ (क), १० लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्यातील आरोपीला तातडीने अटक करून, जबाब नाेंदविले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून, गुन्ह्याच्या अनुषंगाने पंचनामा, प्रत्यक्ष साक्षीदार आणि इतर पुरावे जमा केले. हाती आलेले पुरावे लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

साक्ष, पुरावे महत्त्वपूर्ण ठरले...सुनावणीअंती पोलिसांनी लातूरच्या न्यायालयात दाखल केलेले पुरावे, तपास अधिकारी, पंच आणि प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. याप्रकरणी लातूर न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी २१ नाेव्हेंबर २०२२ राेजी आरोपी रहीम इब्राहिम तांबोळी-शेख याला तीन वर्षांचा कारावास आणि एक हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे.

उपलब्ध पुराव्याच्या आधारे शिक्षा...तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात सबळ पुरावे जमा केले. खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी केलेल्या युक्तिवादावरून लातूर न्यायालयाने आरोपीस शिक्षाही सुनावली आहे. गुन्ह्यामध्ये चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, मॉनिटरिंग सेलचे सपोनि. बालाजी तोटेवाड यांनी केले. तर चंद्रकांत राचमाले यांनी पैरवी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर