शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

‘मोदीजी...मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं’, लातूरच्या शेतकऱ्याचा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:47 IST

PM Narendra Modi interacts with farmers : लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला.

लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी शुक्रवारी संवाद साधला. त्यात लातूर जिल्ह्यातील मातोळा (ता. औसा) येथील शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांचाही समावेश होता. त्यांना पंतप्रधानांनी शेतीशिवाय आणखी काय करता, असा सवाल केला. त्या वेळी शेतकऱ्याने सांगितले की, मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं. असे उत्तर देताच पंतप्रधानांनी अधिक मनमोकळा संवाद केला. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला. तुमच्याजवळ किती जमीन आहे? पूर्वी काय करीत होतात? शेतीशिवाय आणखी काही करता का? असे पंतप्रधानांनी विचारले. त्यावर भोसले म्हणाले, जमीन ३ हेक्टर आहे. त्यावर सोयाबीन आणि तूर पीक घेतले आहे. पूर्वीपासून शेतीच करतो. तसेच शेतीबरोबर माझ्याकडे ९ गायी आणि १३ म्हशी आहेत. ज्याद्वारे मिळालेले पैसे शेतीत लावतो. त्यावर पंतप्रधानांनी विचारले की, कमाई शेतीमध्ये होते की पशुपालनात? त्यावर  भोसले यांनी पशुपालन शेतीला पूरक असल्याचे सांगितले. पंतप्रधान पीक विम्याचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. अडीच हजार विमा भरला होता. त्याचे ५४ हजार ३१५ रुपये मिळाल्याबद्दलही भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनीही केले राम राम पंतप्रधानांनी ‘नमस्ते गणेशजी’, असे म्हणत संवादाला सुरुवात केली. त्या वेळी गणेश यांनी नमस्तेचे उत्तर ‘राम राम’ करून दिले. तेव्हा मोदीही ‘राम राम’ म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी