वृक्ष लागवड व संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:20 AM2021-07-26T04:20:11+5:302021-07-26T04:20:11+5:30

*15 ऑगस्ट रोजी उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यात एक लाख झाडे लावण्याचे नियोजन* उदगीर - वृक्ष लागवड व संवर्धन ...

The MLA will provide Rs. 10 lakhs from the fund to the Gram Panchayat for planting and cultivating trees | वृक्ष लागवड व संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार

वृक्ष लागवड व संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार

Next

*15 ऑगस्ट रोजी उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यात एक लाख झाडे लावण्याचे नियोजन*

उदगीर - वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे, त्यादृष्टीने सर्व विभागांनी मेहनत घेऊन १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजाबरोबर वृक्षाला सलामी देण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम हाती घ्यावी. वृक्ष लागवड आणि संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून दहा लाख रुपये दिले जातील, असे पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी येथे सांगितले.

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, रमेश अंबरखाने, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासह सामाजिक वनीकरण, वन विभाग, महसूल व शिक्षण विभाग, सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सरपंच उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, प्रत्येक गावात, शासकीय कार्यालयात व शाळेत झाडे लावण्यात यावीत. मियावाकी पॅटर्न सर्वत्र राबविण्यात यावा. झाडे लावून ती कशी जगवता येतील त्यासाठी ठोस पाऊल उचलून हरित उदगीर करावे. यात हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. उदगीर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतील व लावलेल्या वृक्षांचे शंभर टक्के संवर्धन करून ती झाडे जगवतील, अशा ग्रामपंचायतींना आमदार फंडातून दहा लाखाचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

१ लाख झाडे लावणार...

सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री फाैंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर, जळकोट, देवणी तालुक्यात १५ ऑगस्ट रोजी एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच उदगीरचा झाडे लावण्याचा पॅटर्न पुढील काळात महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे, वृक्ष लागवडीचा लेखाजोखा घेण्यासाठी एक पथकही नियुक्त करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The MLA will provide Rs. 10 lakhs from the fund to the Gram Panchayat for planting and cultivating trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.