आहारात मिश्र धान्यांचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:36+5:302021-05-09T04:20:36+5:30

बाहेरचे पदार्थ खाऊ नका. उघड्यावरील पदार्थ, पाणी, थंड पदार्थ खाऊ नयेत. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी, डी व झिंक ...

Mixed grains should be used in the diet | आहारात मिश्र धान्यांचा वापर करावा

आहारात मिश्र धान्यांचा वापर करावा

googlenewsNext

बाहेरचे पदार्थ खाऊ नका. उघड्यावरील पदार्थ, पाणी, थंड पदार्थ खाऊ नयेत. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी, डी व झिंक महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असल्याने ते शरीरात साठवू शकत नाही. त्यामुळे आपण लिंबूवर्गीय पदार्थ लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, काेकम याचे सेवन करू शकतो, ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी या गोळ्यांची आवश्यकता भासत नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नका...

कोरोनाकाळात आपण आले, तुळस, हळद, पुदिना, लवंग, ज्येष्ठ मध यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा वापर करू शकतो. निलगिरी तेलाचे दोन थेंब टाकून वाफ घेऊ शकतो, तसेच आयुष काढ्याचे प्रमाणात सेवन करून रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते. आहारात पपई, डाळिंब, आंबे या मोसमी फळांचा वापर करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ नयेत, असेही शेंडगे म्हणाल्या.

Web Title: Mixed grains should be used in the diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.