शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री संजय बनसोडे यांचे उदगीरमध्ये जंगी स्वागत; ठिकठिकाणी जल्लाेष, हजाराे कार्यकर्त्यांची उपस्थिती...

By राजकुमार जोंधळे | Updated: July 15, 2023 03:39 IST

यावेळी उदगीरात मोठे पुष्पहार अर्पण करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

उदगीर - राज्याच्या मंत्रिमंडळात क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री म्हणून संधी मिळालेल्या आमदार संजय बनसोडे यांचे शुक्रवारी उदगीर शहरात आगमन होताच जंगी स्वागत झाले. जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. यावेळी उदगीरात मोठे पुष्पहार अर्पण करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे यांचे उदगीर तालुक्यात आगमन होताच डिग्रस, करडखेल, लोहारा आणि मलकापूरच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत वाजतगाजत स्वागत केले. उदगीर शहरातील उमा चौकामध्ये मंत्री बनसोडे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत वाजतगाजत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, बापूराव राठोड, मनोहर भंडे, रामचंद्र मुक्कावार, गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकूर, माजी सभापती मुन्ना पाटील, भरत चामले, पद्माकर उगीले, रिपाइंचे देविदास कांबळे, पप्पू गायकवाड, शेख समीर यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.

ग्रामदैवताचे घेतले दर्शन...क्रीडा व युवक कल्याण आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे, त्यांच्या सुविद्य पत्नी शिल्पाताई बनसोडे यांनी उदगीर शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील ग्रामदैवत उदगीर बाबा महाराजांचे दर्शन घेतले. सदरोद्दीन बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवली. उदगीरातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. झाकीर हुसेन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

टॅग्स :laturलातूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस