शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

By संदीप शिंदे | Updated: September 5, 2022 17:08 IST

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे

निलंगा (जि. लातूर): तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मसलगा प्रकल्प ९७ टक्के भरला असून, चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी पहाटे मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून ३८.४२ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकल्प अभियंता देशमुख यांनी सांगितले. प्रकल्प ९७ टक्के भरला असून, कुठल्याही क्षणी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाखालील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चार गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने हे पाणी चक्क शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरत असल्याने पीक क्षेत्राचे कायम नुकसान होत आहे. यासंदर्भात हे क्षेत्र कायमस्वरूपी बाधित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करा...अनेक वर्षांपासून सलगा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पातील पाणी सोडल्यास पिकांची आशा सोडून द्यावी लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी गुरुनाथ जाधव, तुळशीदास साळुंखे, अभिनंदन जाधव, बलभीम जाधव, पंडित जाधव, प्रकाश ओम, निवृत्ती पाटील, प्रकाश जाधव, सतीश जाधव, बळीराम पाटील, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पवार, गोविंद पाटील, हरी साळुंखे, पांडुरंग साळुंखे यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती