शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वाढीव घरपट्टी, नळपट्टीच्या निषेधार्थ उदगीरात नगरपालिकेवर मोर्चा

By हरी मोकाशे | Updated: March 2, 2023 17:20 IST

उदगीरात नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचा संताप

उदगीर : नगरपालिकेने शहरवासियांवर लादलेली वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अनावश्यक करामुळे सर्वसामान्य बेजार झाले आहेत. वाढीव कर रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी गुरुवारी दुपारी येथील नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

उदगीर पालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अनावश्यक कर मोठ्या प्रमाणात वाढवून वसूली सुरु केली आहे. हा वाढीव कर रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चात शहरातील नागरिक हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. पालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे यांनी संताप व्यक्त करीत जोपर्यंत पालिका वाढीव कर रद्द करीत नाही, तोपर्यंत शहरातील कुठल्याही नागरिकांनी पालिकेचा कोणताही कर भरणा करु नये, असे आवाहन केले. यावेळी रंगा राचुरे, रमेश अंबरखाने यांची समायोचित भाषणे झाली.

ठराव न घेताच करात दुप्पट वाढ...मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पालिकेतर्फे शहरवासियांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, काही वर्षांपासून तो सुरळीत होत नाही. महिन्यातून एकदा अथवा दोनदा पाणीपुरवठा होतो. मात्र, नळपट्टी संपूर्ण महिन्याची वसूल केली जाते. शासन निधीतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही नियमित पाणीपुरवठा होत नाही. पालिकेत ठराव मंजूर न करता पाणीपट्टीत दुप्पट वाढ करून सक्तीची वसुली सुरु आहे. इतर सोयी- सवलती न देता शिक्षण, आरोग्य, वृक्ष असे अनावश्यक कर वसूल केले जात आहेत. शहरात पालिकेची एकही शाळा नाही, एकही दवाखाना नाही, शहरात वृक्ष लागवड नाही, सार्वजनिक उद्यान, क्रीडांगण, सभागृह, ज्येष्ठांच्या व दिव्यांगांच्या सोयीच्या योजना नाहीत. परंतु, सर्व कर सक्तीने वसूल केले जात आहेत. हा शहरातील नागरिकांवर अन्याय आहे. शहरात नियमित स्वच्छता करावी, श्वान, वराहांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

निवेदनावर नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष रंगा राचुरे, माजी आ. प्रा. मनोहर पटवारी, सिध्देश्वर पाटील, मौलाना हबीब रहमान, प्रा. डॉ. विजयकुमार पाटील, फय्याज शेख, एन.एल. तिकटे, बापूसाहेब कज्जेवाड, रामविलास नावंदर, मंजुरखाॅ पठाण, सनाउल्ला खान, ॲड. व्ही.एन. औरादे, संग्राम हुडगे, बस्वराज पाटील मलकापूरकर, मारोतीराव चौधरी, शिवशंकर बडीहवेली, डॉ. ए.आर. पाटील, राम जाधव, धनाजी बनसोडे, बाबासाहेब सूर्यवंशी, दीपक बलसूरकर, प्रा. एस.एस. पाटील, अहमद सरवर, नजीर हाशमी, सुधाकर दापकेकर यांच्यासह जवळपास दोन हजार नागरिकांच्या सह्या आहेत. मार्चात महिलांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूर