अध्यक्षस्थानी मधुकर वट्टमवार तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाघमारे, डॉ. संजय कुलकर्णी, व्यंकटराव गुरमे, बालाजी चटलावार, षन्मुखानंद मठपती, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, लालासाहेब गुळभिले यांची उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या भित्तीपत्रकाचे आणि १, २ ऑक्टोबर २०२१ रोजी विद्यालयात होणाऱ्या ४२ व्या मराठवाडा पातळीवरील लालबहादूर शास्त्री ऑनलाईन आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले. तर विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजया गोविंदवाड यांनी केले. प्रास्ताविक नीता मोरे, वैयक्तिक गीत शिल्पा सेलूकर यांनी गायले. आभार विठ्ठल पस्तापूरे यांनी मानले. माधव मठवाले यांच्या वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी निता मोरे, ज्योती घोडके, अनिता येलमटे, संतोष गजलवार, संतोष कोले, विनायक इंगळे, गुरुदत्त महामुनी, छाया दिक्कतवार, बालाजी खोडवे, विष्णू तेलंग यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला.
लालबहादूर शास्त्री विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST