शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

मराठा क्रांती मोर्चाचे लातूर येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले.

लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षण टिकविण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्थगिती आदेशाच्या अनुषंगाने आदेशाच्या दिवसापर्यंत ज्या- ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश झाले आहेत, नियुक्त्या मिळाल्या आहेत त्या सर्वांना संरक्षण देण्यात यावे, स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरतीसह कुठलीही मेगाभरती करू नये, असेही आंदोलनकर्त्यांनी आ. विक्रम काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भगवान माकणे, आदित्यराणा चव्हाण, प्रवीण खाडप, बालाजी जाधव, अनिल जाधव, विशाल हल्लाळे, किशन कदम, सचिन साळुंके, दयानंद जाधव, निखिल मोरे, संजय क्षीरसागर, विजयकुमार महाजन, चंद्रकांत शिंदे, गोविंद सूर्यवंशी, सतीश करडे, जीवन तुपे, आकाश येरटे, विलास भोसले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण