शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

घोषणेनंतर प्रकल्पांना मंजुरी नाहीच, लातूरकरांच्या स्वप्नातील रेल्वे कधी येणार रुळावर!

By राजकुमार जोंधळे | Updated: February 1, 2023 17:23 IST

रेल्वेमंत्र्यांना साकडे : बाेधन -उदगीर, लातूर राेड-नांदेड रेल्वे मार्ग रखडला

लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे मार्गाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सतत मराठवाड्यातील नागरिकांकडून, प्रवाशांकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे. बाेधन - उदगीर, उस्मानाबद - बीड आणि साेलापूर - बीड - जळगाव हा रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडला आहे. ताे केव्हा मंजूर हाेणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना मराठवाडा जनता विकास परिषद लातूर महानगर शाखेच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे मंगळवारी साकडे घातले आहे.

यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. भारत साबदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले. यामध्ये लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, ॲड. व्यंकट बेद्रे, प्रा. सुधीर अनवले, महेंद्र जाेशी, शामसुंदर मानधना, ईश्वरचंद्र बाहेती, किशाेर जैन, प्रकाश घादगिने, शेख उस्मान, प्रा. भालचंद्र येडवे, प्रा. याेगेश शर्मा, राजकुमार हाेळीकर यांचा समावेश हाेता.

रेल्वेकाेच फॅक्टरीत स्थानिकांना आरक्षण द्या...लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतील नाेकर भरती करताना प्रामुख्याने स्थानिक उमेदवारांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने यावेळी केली आहे.

नांदेड-बीदर मार्गासाठी जमीन संपादन करा...नांदेड आणि बीदर येथील गुरुद्वारांना भाविकांना सहज भेट देता यावी, प्रवासासाठी साेय व्हावी. यासाठी नांदेड-बीदर या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचा वाटा, जमीन संपादनाची सूचना राज्य शासनाला द्यावी. औरंगाबाद-अहमदनगर, औरंगाबाद-चाळीसगाव या नव्या रेल्वे मार्गाला तातडीने रेल्वे मंत्रालयाने मंजुरी द्यावी.

लातूर राेड - अहमदपूर - लाेहा - नांदेड मार्ग कधी?गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर राेड - अहमदपूर - लाेहा - नांदेड रेल्वे मार्ग मंजुरीच्या कात्रीत अडकला आहे. या रेल्वे मार्गाला मंजुरी देत हा प्रश्न साेडवावा, अशी मागणीही केली आहे. त्याचबराेबर किनवट-माहूर या नवीन रेल्वे मार्गालाही मंजुरी देण्यात यावी.

नांदेड मध्यरेल्वे विभागाला जाेडा...विशेष म्हणजे... रेल्वेचा नांदेड विभाग दक्षिण-मध्य रेल्वेऐवजी ताे मध्य रेल्वे विभागाला जाेडण्यात यावा, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेlaturलातूरtourismपर्यटन