उदगीर येथे वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित ८७ वा धर्मवीर संग्रामप्पा शेटकार वचन सप्ताहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर लिंगायत सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव पाटील भोपणीकर होते. मंचावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, उपाध्यक्ष प्रमोद शेटकार उपस्थित होते. प्रा. मनोहर भालके म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेला धर्म हाच आपल्या जगण्याचा आणि आचरणाचा मार्ग बनला पाहिजे. माणूस धर्माकरिता नसून, धर्म माणसाकरिता आहे. सदाचरण हेच स्वर्गप्राप्तीचे साधन असले पाहिजे. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय वीरशैव समाजाचे सचिव ॲड. श्रीकांत बडीहवेली यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र हसरगुंडे यांनी केले. आभार उत्तरा कलबुर्गे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वरांचे कार्य मानव कल्याणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST