शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 21:04 IST

आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.

लातूर : प्रत्येक मूल शाळेत यावे, शिकावे या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'शिक्षणाच्या वारीचे ' हे तिसरे वर्ष असून या आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणाच्या वारीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लातूर शहरातील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स या ठिकाणी १७ ते १९ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत शिक्षणाची वारी संपन्न होत आहे. लातूर या वारीचे उद्घाटन शिक्षण आयुक्त डॉ. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, विद्या प्राधिकरण, पुणेचे संचालक डॉ. सुनील मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून रंगविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम स्थानांवर नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षक प्रगत झाला तरच शाळा प्रगत होऊ शकते व हे दोन्ही प्रगत झाले तरच विद्यार्थी प्रगत होऊ शकतात. विद्यार्थी प्रगत झाल्यास आदर्श नागरिक घडवणे सुलभ होऊ शकते. यावेळी आ. विक्रम काळे, खा. डॉ. सुनील गायकवाड इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली.विनोद तावडेंनी केले भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना मार्गदर्शनशिक्षणाच्या वारीचे संकल्पक, शालेय व उच्च-तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे मुंबईत अचानक महत्वाची बैठक लागल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. एक शिक्षणप्रेमी व वाचकप्रेमी नेतृत्व अशी ओळख निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरलेल्या विनोद तावडे यांनी लातूरमध्ये संपन्न होत असलेल्या या शिक्षणाच्या वारीला थेट भ्रमणध्वनीवरून संबोधित केले.ते म्हणाले की, लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या लातुरात पहिल्यांदाच ही वारी संपन्न होत आहे. आपल्या सरकारच्या या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. हे यश अर्थातच या वारीच्या माध्यमातून शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे आहे. या वारीच्या माध्यमातून ज्या - ज्या शिक्षकांनी चांगली संकल्पना, प्रयोग केला आहे, त्याचा मोबाईल ॲप तयार केला जावा. राज्याच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा उपयोग अवघ्या देशाला व्हावा, यासाठीही आपण प्रयत्न करू. शिक्षकांना ऑनलाइनच्या कामातून आठ दिवसांत कमी करू, असे तावडे यांनी सांगितले. शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून राज्य लवकरच शिक्षणाच्या क्षेत्रात प्रथम स्थानावर पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त व्यक्त केला

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे