शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : लातूर जिल्ह्यात सुधाकर भालेराव, रमेश कराड, माने यांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 11:48 IST

४१ जणांनी माघार घेतली.

ठळक मुद्देअहमदपूर, औशातील सामना बहुरंगी 

लातूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात आता ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत़  ४१ जणांनी माघार घेतली. यात उदगीरचे विद्यमान आ़ सुधाकर भालेराव, औशातून माजी आ़ दिनकर माने, लातूर ग्रामीणमधून  भाजपचे  रमेश कराड यांचा समावेश आहे़

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १० जणांनी माघार घेतली असून, १५ जण रिंगणात आहेत़ लातूर शहर विधानसभा मतदारसंघात तिघांनी माघार घेतली असून, १९ जण रिंगणात आहेत़ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ९ जण रिंगणात असून, चार जणांनी माघार घेतली आहे़ उदगीर विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत़ तर अखेरच्या दिवशी सोमवारी ८ जणांनी माघार घेतली आहे़ निलंगा विधानसभा मतदारसंघात सहा जणांनी माघार घेतली असून, १० जण लढत देत आहेत़ तसेच औसा विधानसभा मतदारसंघात १० जणांनी माघार घेतली असून, १४ उमेदवार रिंगणात आहेत़ लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर आणि औसा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली होती़ 

अहमदपूर, औशातील सामना बहुरंगी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी माने यांची मनधरणी केल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली़ परंतु, भाजपचे बजरंग जाधव यांनी बंड कायम ठेवल्याने औश्यातील सामना बहुरंगी होईल़ उदगीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ़ सुधाकर भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी आणि भाजपात लढत होईल़ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख यांनी मात्र बंडाचे निशाण कायम ठेवले आहे़ शिवाय, यापूर्वीच अयोध्याताई केंद्रे यांनी वंचितकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे अहमदपुरातही लढत बहुरंगी होईल़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019laturलातूरlatur-rural-acलातूर ग्रामीणlatur-city-acलातूर शहरudgir-acउदगीरausa-acऔसाnilanga-acनिलंगा