शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा लागतोय कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

जळकोट : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पाेहोचला आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक ...

जळकोट : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पाेहोचला आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला आहे. दरम्यान, मतदारांचा शोध घेण्यात उमेदवारांची दमछाक होत असताना दिसून येत आहे.

तालुक्यातील सोनवळा, बेळसांगवी, अतनूर, रावणकोळा, कुणकी, लाळी बु., बोरगाव, एकुर्का, घोणसी, चिंचोली, मेवापूर, धामणगाव, शेलदरा, विराळ, वडगाव, वांजरवाडा, शिवाजीनगर तांडा, सुल्हाळी, डोंगरगाव, येलदरा, गव्हाण, हळद वाढवणा, मरसांगवी, पाटोदा खु., कोळनूर, डोंगर कोनाळी अशा २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. चिन्ह वाटपानंतर ग्रामीण भागात प्रचाराला वेग आला आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर कुठे तिरंगी लढती होत आहेत.

वांजरवाड्यासारख्या मोठ्या गावात चौरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. पॅनल अधिक असल्याने मतदारांना कोणता उमेदवार कोणत्या पॅनलमधून आहे, याची खात्री करून घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी जुन्या मोहऱ्यांसह नवीन चेहरे रिंगणात आहेत. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी विषय ऐरणीवर आले आहेत.

सध्या ग्रामीण भागात तूर काढणी, रबी पिकांतील अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मतदार घरी भेटत नाहीत. उमेदवारांकडून मतदारांचा शोध सुरू आहे. भेटलेले मतदार मी तुमचाच आहे, अशी चाणाक्ष उत्तरे देत आहेत.

वांजरवाड्यात चौरंगी सामना...

पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे यांच्या वांजरवाडा गावात चौरंगी सामना होत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे यांच्या धामणगावात दुरंगी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांच्या सोनवळा गावात चुरशीची लढत होत आहे. युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या हळद वाढवणा गावात दुरंगी लढत होत आहे.

निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज...

निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, धनश्री स्वामी, शेख, पी.आर. घाटे, तलाठी विश्वासराव धुप्पे आदींची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

बाहेरगावच्या मित्रांची आठवण...

लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे, मुंबईहून आलेल्यांवर सर्वांच्या नजरा होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी काही ठिकाणी वाद झाले. आता आपल्या पॅनलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांना मतदानासाठी गावात कसे आणता येईल, यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत.