शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी बसव सेवा संघाचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:42 IST

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आहे. मात्र सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता देता येत नसल्याचे वक्तव्य केले.

लातूर : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आहे. मात्र सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता देता येत नसल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध बसव सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी लातूर येथे करण्यात आला. बसवेश्वर उद्यानासमोर झालेल्या आंदोलनात लिंगायत समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील लिंगायत समाजाच्या परंपरा आणि प्रथा लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांनी केंद्र शासनाकडे स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता देण्यासंदर्भात शिफारस करावी. गेल्या पाच वर्षांपासून लिंगायत समाजाच्या वतीने मोर्चे, आंदोलने करून लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी गुरुवारी विधानसभेच्या अधिवेशनात लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देता येत नाही. लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच एक पंथ आहे, असे वक्तव्य करून लिंगायत समाजविरोधी भूमिका जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी लातुरात बसवेश्वर उद्यान परिसरात आंदोलन झाले. आंदोलनात बसव सेवा संघाचे अध्यक्ष बालाजीअप्पा पिंपळे, संजय राजुरे, शशिकांत बुलबुले, एस.बी. चिलबिले, श्रीनिवास मेनकुदळे, अमित पाटील, अमित खराबे, सुनील ताडमाडगे, ईश्वर तत्तापुरे, अ‍ॅड. अजय कलशेट्टे, शिवहर बिराजदार, महेश बिडवे, अमोल वांगजे, कमलाकर कांबळे, अमर बुरबुरे, गणेश तळणे, प्रेम शेटकार, निलेश कुरडे, संतोष सुलगुडले, विशाल झुंजे पाटील, प्रसाद बेरकिळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूर