शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या मजबुतीसाठी चला मतदान करूया; जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:48 IST

 लातूर लोकसभेसाठी ७५ टक्क्यांचे उद्दिष्ट

ठळक मुद्देसैनिकांसाठी विशेष सुविधा... 

- आशपाक पठाण

लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून जनाजगृती करण्यात येत आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन केले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, यावर्षी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासन मतदारसंघात जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देणार आहेत. पोस्टर्स, पॉम्प्लेटच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करीत आहोत. होळीच्या निमित्ताने व्हीडिओ क्लीप तयार केली असून, ती समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे. अंध, अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक (ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही) अशा नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने वाहनांची सोय केली आहे. आमचा निवडणूक रथ गावा-गावात, प्रभागातील बूथवर मतदानासाठी अशा मतदारांना पोहोचविण्याचे काम करणार आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय कार्यालये व गावस्तरावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व विशद केले जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात २८ मार्चपासून प्रचार व प्रसार करण्याचे काम वाढविले जाणार आहे. 

पालकांना विद्यार्थ्यांचे पत्र... मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शहरातील विशेष म्हणजे उच्चभ्रू शाळेत ईव्हीएम मशीनचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाईल. शिवाय, सदरील विद्यार्थी आपल्या पालकांना मतदानासाठी आवाहन करणारे संकल्प पत्र लिहितील. यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. 

सैनिकांसाठी विशेष सुविधा... लातूर लोकसभा मतदारसंघात नोकरीच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार मतदार बाहेरगावी आहेत. यात विशेष म्हणजे सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून मतपत्रिका पाठविल्या जातील. संबंधित व्यक्ती मतदान करून त्या मतपत्रिका पोस्टाद्वारे परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवतील. यासाठी साडेचार हजार जणांना मतपत्रिका पाठविण्याची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlaturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरVotingमतदान