शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला शिकू द्या, लवकर शिक्षकांची नियुक्ती करा'; विद्यार्थ्यांचा लातूर जिल्हा परिषदेत ठिय्या

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2023 16:25 IST

शैक्षणिक नुकसान होत असल्याने अंधोरीतील मुले आक्रमक

लातूर : अंधोरी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी, आम्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी बुधवारी थेट जिल्हा परिषद गाठली अन् दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, सीईओंकडे धाव घेऊन आपल्या अडचणी मांडल्या.

अहमदपूर तालुक्यातील अंधाेरी येथे जिल्हा परिषद प्रशाला आहे. प्रशालेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रशालेची पटसंख्या जवळपास २३० आहे. प्रशालेसाठी एकूण १० शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. प्रशालेतील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामाजिकशास्त्र तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्र विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही. तसेच प्राथमिक शिक्षकाचे एक पद रिक्त आहे.

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. परिणामी, शाळेची पटसंख्या घटत आहे. काही पालकांनी आपल्या मुलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन अन्य शाळेत प्रवेश घेतला आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत बुधवारी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सदस्य नमोद कांबळे, गुणवंत बेंबडे, शेषाबाई कावळे, त्रिमुख बने यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

अन् पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखले...जिल्हा परिषदेचे सीईओ अथवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडण्यासाठी अंधोरीच्या प्रशालेतील विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी बुधवारी सकाळी वाहनाने जिल्हा परिषदेत आले. ते मुख्य इमारतीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना तिथेच रोखले. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...दोन वर्षांपासून प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे रिक्त आहेत. ती भरण्यात यावीत म्हणून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहोत. परंतु, अद्यापही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याठी विद्यार्थ्यांसह आम्ही हे आंदोलन केले.- दिनेश सूर्यवंशी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, अंधोरी.

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण