शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणीची चमक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 17, 2024 20:09 IST

राष्ट्रीयस्तरावर लातूरची पहिली पदकविजेता खेळाडू

महेश पाळणे / लातूर : राज्य स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केलेल्या लातूरच्या श्रावणी राजेंद्र जगताप हिने राष्ट्रीय स्पर्धेतही आपली पदकांची लय कायम ठेवत राज्याच्या संघाकडून खेळताना रौप्यपदक प्राप्त केले. त्यामुळे ॲक्वाथॉन खेळात राष्ट्रीयस्तरावर लातूरला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणी जगतापने आपल्या कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकाविले. ज्युनिअर गटात तिने ही चमक दाखविली आहे. यात देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अवघ्या २४.७ मिनिटाच्या कालावधीत तिने जलतरण आणि सायकलिंग करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षक नीळकंठ हेंबाडे, राहुल होनसांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य स्पर्धेत पदकांचा होता डबल धमाका..गत महिन्यात पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने ट्रायथलॉंन प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते, तर ॲक्वाथॉन प्रकारात रौप्यपदक पटकावत दुहेरी धमाका केला होता. या जोरावरच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

२५ सेकंदाने हुकले सुवर्णपदक...या राष्ट्रीय स्पर्धेत श्रावणीने २४.७ मिनिटांचा वेळ घेत जलतरण व रनिंग करत रौप्यपदक पटकाविले. प्रथम आलेल्या खेळाडूचा वेळ हा २३.४२ मिनिटे होता, त्यामुळे तिचे सुवर्णपदक अवघ्या २५ सेकंदांनी हुकले.

स्विमिंगची भरपाई केली रनिंगमध्ये..या खेळात लगातार स्विमिंग व रनिंग केली जाते. ४५० मीटर स्विमिंग व ३.७५ कि.मी. रनिंग असा या खेळाचा उद्देश असतो. या स्पर्धेत ती स्विमिंग प्रकारात सहाव्या स्थानी होती, मात्र तिने रनिंग मध्ये तो टायमिंग कव्हर करत देशभरात दुसरे स्थान पटकाविले.

भारताकडून खेळण्याचे स्वप्न...राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याचा आनंद आहे, विशेषत: लातूरसाठी या खेळात राष्ट्रीयस्तरावर माझ्या रूपाने पदक आले. माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड चाचणी झाली होती. त्यात माझा पाचवा क्रम होता. या पदकाने आत्मविश्वास वाढला असून, अबुधाबी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मी तयारी करणार आहे.- श्रावणी जगताप

टॅग्स :laturलातूर