शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कॉमनवेल्थ तलवारबाजीत लातूरच्या साईप्रसादची चमक; न्यूझिलँड येथील स्पर्धेत सांघिक कांस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:59 IST

छत्रपती संभाजीनगर येथे साई केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईप्रसादने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

- महेश पाळणे

लातूर : तलवारबाजीतील आक्रमक कौशल्य तसेच उत्कृष्ट डिफेन्सच्या जोरावर लातूरच्या साईप्रसाद संग्राम जंगवाडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. न्यूझिलँड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत सांघिक कांस्यपदक पटकावीत लातूरचे नाव रोशन केले आहे. अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात शिकणाऱ्या साईप्रसाद जंगवाडने १७ वर्षांखालील वयोगटात इप्पी प्रकारात हे यश मिळविले आहे. चार जणांच्या असणाऱ्या या संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू म्हणून साईप्रसादची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत साईप्रसादने हे यश मिळविले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे साई केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईप्रसादने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. यापूर्वीही साईप्रसादने आपल्या कामगिरीच्या जोरावर तलवारबाजी खेळात अनेकवेळा यश संपादन केले आहे. त्यास प्रशिक्षक वजिरोद्दीन काझी, आकाश बनसोडे, मोहसीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते दत्ता गलाले, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. अभिजीत मोरे यांनी कौतुक केले आहे.

वैयक्तिक प्रकारात पाचवा...सांघिक प्रकारात साईप्रसादने भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले असून, वैयक्तिक प्रकारात तो या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहिला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनंतर त्याने वैयक्तिक प्रकारात पाचवे स्थान पटकाविले आहे. नियमित पाच तास सराव करणाऱ्या साईप्रसादने हे यश मिळविले आहे.

राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतही दबदबा...यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत साईप्रसादने तलवारबाजीत आपली धार दाखवून दिली आहे. बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेटस् स्पर्धेत त्याने सहभाग नोंदविला होता. यासह चार राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा सुवर्ण तर एकवेळा रौप्यपदक पटकाविले आहे. यासह राज्य स्पर्धेत त्याने ६ वेळेस सुवर्ण तर १० वेळेस कांस्यपद पटकाविले आहे. त्याच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. आजतागायत त्याने राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत ४० वेळा विविध पदके पटकाविली आहेत.

टॅग्स :laturलातूर