लातुरात रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By संदीप शिंदे | Published: February 1, 2023 01:19 PM2023-02-01T13:19:30+5:302023-02-01T13:21:01+5:30

रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Laturat Employment Guarantee Scheme Employees Protest | लातुरात रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

लातुरात रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Next

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतिबंधामध्ये समायोजन करावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

रोजगार हमी योजनेच्या सहायक कार्यक्रमाधिकारी, तांत्रिक सहायक, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक यांना पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, योजनेतील कर्मचारी यांनी राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, मध्य प्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या ६२ वर्षेपर्यंत नोकरीची ही देण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब जाधव, गणेश गायकवाड, स्नेहल मोरे, शिवराज स्वामी, शिवाजी पुरी, पंढरीनाथ माने, दत्ता मद्वे, अविनाश ढवळे, विजयकुमार घटबाळे, सूर्यकांत बारबोले, राहुल पोतदार, नासीर गुडवाले, विजयालक्ष्मी मुंडे, नीता काळे, अनिल मिरकले, पूजा भोसले, संतोष पवार, अनुप पावले आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Laturat Employment Guarantee Scheme Employees Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.