शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात महायुतीची सत्ता टिकली, पण भाजपचा गड ढासळला; काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:58 IST

गत निवडणुकीत ३५ जागांसह एकहाती वर्चस्व राखणारा भाजप यंदा १८ जागांवर येऊन फेकला गेला आहे.

लातूर: लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या युद्धात भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना महायुतीने सत्तेचा सोपान गाठला असला, तरी भारतीय जनता पक्षाला या निकालाने मोठा धक्का दिला आहे. भाजपने आपल्या हक्काच्या १७ जागा गमावल्या आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत जिल्ह्यात आपले स्थान पुन्हा एकदा निर्माण केले आहे.

भाजपला मोठा हादरा, काँग्रेसची भरारी गत निवडणुकीत ३५ जागांसह एकहाती वर्चस्व राखणारा भाजप यंदा १८ जागांवर येऊन फेकला गेला आहे. याउलट, काँग्रेसने दमदार कामगिरी करत आपल्या जागा १५ वरून २३ वर नेल्या आहेत. काँग्रेस आता जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, महायुतीच्या एकत्रित बलाबलानुसार सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीकडेच राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) ठरली 'किंगमेकर' या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. त्यांच्या १२ जागा निवडून आल्याने भाजपची सत्ता टिकवण्यासाठी हे 'बळ' अत्यंत मोलाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, मनसे आणि शिंदेसेना यांनी लातूर जिल्हा परिषदेत आपले खाते उघडून इतिहास रचला आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनाही प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. दोन अपक्षांनीही प्रस्थापितांना धूळ चारत विजय मिळवला आहे.

नवे पक्षीय बलाबल (एकूण ५९ जागा):

काँग्रेस: २३

भाजप: १८

राष्ट्रवादी (अजित पवार): १२

शिंदेसेना: ०१

उद्धवसेना: ०१

मनसे: ०१

राष्ट्रवादी (शरद पवार): ०१

अपक्ष: ०२

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Mahayuti Retains Power, BJP Lost Ground; Congress Gains!

Web Summary : In Latur, Mahayuti retained power in Zilla Parishad elections, but BJP suffered losses. Congress emerged as the largest party, gaining significant ground. NCP (Ajit Pawar) plays kingmaker.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६laturलातूर