शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Latur: रात्रीच्या काळाेखात दाेन दुचाकी, दाेन कारचा पुलावरच विचित्र अपघात, तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 00:13 IST

Accident: दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन दुचाकी, दाेन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली

लातूर : दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन दुचाकी, दाेन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात तीन गंभीर, तर एक किरकाेळ जखमी झाला आहे. यातील एक दुचाकी आणि एक कार पुलावरून नदीपात्रात काेसळली आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, लातूर ते औसा महामार्गाचे सध्याला काम सुरू आहे. दरम्यान, पेठ गावानजीक असलेल्या नदीवरील पूल अरुंद असून, त्याचेही काम सुरू आहे. मंगळवारी रात्री या पुलावर भरधाव असलेल्या दाेन कार आणि दाेन दुचाकींचा अपघात झाला. एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. हा अपघात एवढा विचित्र हाेता की, रात्रीच्या काळोखात काहीच समजत नव्हते. अपघातानंतर दाेन्ही बाजूंची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या गावकऱ्यांनी, तेथील वाहनधारकाने घटनेची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांना दिली. घटनास्थळी पाेलिस पथक दाखल झाले. त्यांनी तातडीने अपघातातील तिघा गंभीर जमखी आणि अन्य एका किरकाेळ व्यक्तीला उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल केले. यातील जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. चारही जखमींमध्ये पुरुष असल्याचे पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सहायक पाेलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, बाबूराव येणेकुरे, राहुल दराेडे, सचिन चंद्रपाटले, पाेलिस कर्मचारी खंडागळे यांनी भेट दिली.

दुचाकी, कार नदीपात्रात काेसळली...अपघातानंतर चार वाहनांपैकी एक दुचाकी आणि एक कार नदीपात्रात काेसळली. यामध्ये दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर नदीपात्रात फारसे पाणी नसल्याने जीवित हानी झाली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले, तर अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या अपघाताच्या थराराने प्रत्यक्षदर्शीच्या काळजाचा ठाेकाच चुकला.

क्षणात चारही वाहने एकमेकांवर धडकली...पेठ येथील पुलावरील मार्ग अरुंद आहे. त्यासाठी येथे वाहने सावकाश चालवावी लागतात. मात्र, भरधाव आलेल्या वाहनधारकांचा हा अपघात एवढा विचित्र हाेता की, काही कळायच्या आतच चारही वाहने एकमेकांवर धडकली. दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन कार, दाेन दुचाकींचा अपघात झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

काही वेळासाठी वाहतूक झाली ठप्प...लातूर- औसा महामार्गावरील पेठ पुलावर झालेल्या अपघातानंतर काही वेळासाठी दाेन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली हाेती. तातडीने अपघातातील जमखींना एका वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर पाेलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर