शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या खूनप्रकरणी फरार दाेघांना हैदराबादमधून उचलले, पाेलिसांनी कारवाई

By राजकुमार जोंधळे | Updated: May 11, 2025 01:30 IST

Latur Crime News: जयंतीच्या वादातून झालेल्या शिक्षकाच्या खून प्रकरणात फरार दाेघा आराेपींच्या मुसक्या हैदराबाद येथून पाेलिस पथकांनी आवळल्या आहेत. ही कारवाई कासार शिरसी ठाण्याच्या पाेलिसांनी केली आहे. आतापर्यंत सर्व ९ आराेपींना अटक करण्यात आली आहे.

- राजकुमार जाेंधळे  कासार शिरसी (जि. लातूर) - जयंतीच्या वादातून झालेल्या शिक्षकाच्या खून प्रकरणात फरार दाेघा आराेपींच्या मुसक्या हैदराबाद येथून पाेलिस पथकांनी आवळल्या आहेत. ही कारवाई कासार शिरसी ठाण्याच्या पाेलिसांनी केली आहे. आतापर्यंत सर्व ९ आराेपींना अटक करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, औंढा (ता. निलंगा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरून वाद झाला हाेता. दरम्यान, २६ एप्रिलरोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीमध्ये बडूर गावचे शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कासार शिरसी पाेलिस ठाण्यात दत्तू मारुती गायकवाड (रा. औंढा), अजय चौंडा, अझर मोहम्मद ,आदित्य मोरे, गजेंद्र सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार शिरसी), संजय गायकवाड राजेंद्र गायकवाड, शहाजी गायकवाड (रा. औंढा) अशा ९ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करत सात आरोपींना अटक केली. मात्र, यातील अझर मोहम्मद आणि गजेंद्र सरवदे हे पाेलिसांना गुंगारा देत फरार हाेते. दरम्यान, ते हैदराबाद येथे दडून बसल्याची माहिती कासार शिरसी पाेलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधार पाेलिस पथक हैदराबाद येथे धडकत दाेघा फरार आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक व्हावी, गुरुलिंग हासुरे यांना न्याय मिळावा म्हणून बडूर येथे गेल्या आठवडाभरापासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिली आहे. गुरुवारी डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही बडूर येथे भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. फरार आराेपींना तातडीने अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली हाेती. दरम्यान, अवघ्या २४ तासात सहायक पाेलिस निरीक्षक प्रविण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, बाळू गायकवाड, श्रीहरी डावरगावे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने दाेघा आराेपींच्या हैदराबाद येथून मुसक्या आवळल्या आहेत.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी