शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या

By राजकुमार जोंधळे | Updated: October 28, 2023 20:47 IST

Crime News: ​​​​​​​लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- राजकुमार जाेंधळे लातूर -  जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपुरातील सराफा व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी १७ ते १९ जूनच्या मध्यरात्री प्रवेश केला. सोन्याचे दागिने, एक पिस्टल चाेरुन नेल्याची घटना घडली. आराेपींच्या शाेधासाठी पाेलिस मागावर हाेते. दरम्यान, रेकॉर्डवरील अन् शेजारच्या जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांना ताब्यात घेत चाैकशी करण्यात आली. याबाबत पाेलिसांना खबऱ्याने माहिती दिली. यानुसार राम तुकाराम बने (२७), विजय अशोक कदम (दाेघे रा. गायकवाड कॉलनी, अहमदपूर) आणि केदारनाथ नामदेव गाडे (२९ रा. रुई ता. अहमदपूर) यांना २४ आक्टोबररोजी ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले १७ लाख ६६ हजारांचे सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पो.नि. सुधाकर देडे करीत आहेत.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अहमदपूर येथील डीवायएसपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सूर्यवंशी, तानाजी आरादवाड, राजकुमार डबेटवार, बापू धुळगुंडे, रुपेश कज्जेवाड, पाराजी पुठेवाड यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर