शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

Latur: तेलंगणातील व्यक्तीचा खून करून देवर्जनच्या विहिरीत मृतदेह फेकले, प्राॅपर्टीच्या वादातून संपविले

By राजकुमार जोंधळे | Updated: May 25, 2024 23:51 IST

Latur News: उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरातील हत्तीबेट येथील वनविभागाच्या विहिरीत शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लातूरसह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील पोलिसांना मयत व्यक्तीचे फोटो पाठविले.

- राजकुमार जाेंधळे लातूर - उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरातील हत्तीबेट येथील वनविभागाच्या विहिरीत शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लातूरसह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील पोलिसांना मयत व्यक्तीचे फोटो पाठविले. अवघ्या चार तासात मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. हा मृतदेह तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील असून, बहिण आणि भाचाने मालमत्तेच्या वादातून हा खून केल्याचे समाेर आले. व्यंकटेश मलय्या मलपुरी (वय ५८, रा. कुसनूर ता. कल्लेर जि. संगारेड्डी, तेलंगाणा) असे मयताचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, देवर्जन येथील हत्तीबेट परीसरात शनिवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. महाराष्ट्र आणि सीमाभागातील पोलिसांची गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठका होत असतात. हत्तीबेटावरील विहिरीत आढळलेल्या मृतदेह छायाचित्र कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांना पाठविण्यात आले. शनिवारी सायंकाळी तेलंगाणातील संगारेड्डी येथील पोलिसांनी उदगीर पोलिसांशी संपर्क साधत तो मृतदेह त्यांच्या हद्दीतील असल्याचे सांगितले. संगारेड्डी येथून मयत व्यक्तीचे अपहरण झाले असून, संगारेड्डी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मयताचे नातेवाईक आणि तेलंगाना पोलिस शनिवारी सायंकाळी उदगीरात दाखल झाले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे.

प्राॅपर्टीच्या वादातूनच अभियंता असलेल्या भाचाने काढला काटा...व्यंकटेश मलय्या मलपुरी याचे गुरुवारी अपहरण केले. व्यंकटेश मलपुरी यांचे त्याचा अभियंता असलेला भाचा नरेंद्र मलय्या परशेट्टी (३०, रा. लाडेगाव ता. जुक्कल, तेलंगणा) यांच्यासह अन्य चाैघांनी गुरुवारी मालमत्तेच्या वादातून अपहरण केले होते. दरम्यान, व्यंकटेशचा गळा आवळून आणि डोक्यात मारून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी गुरुवारी रात्री देवर्जन येथील हत्तीबेट परिसरातील वन विभागाच्या विहिरीत मृतदेह टाकला होता. आरोपींमध्ये देगलूरच्या दोघांचा समावेश असल्याचे समाेर आले. बहिण आणि भाचाने प्रॉपर्टीच्या वादातून हा खून केल्याचे उघड झाले. संगारेड्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.- अरविंद पवार, पोलिस निरीक्षक, उदगीर

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी