शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

Latur: पंचनामे न झाल्याने संतापले सरपंच, तहसीलदारांच्या अंगावर फेकले पैशाचे बंडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:07 IST

‘सरकारला भीक लागली आहे, आम्ही ग्रामस्थांकडून वर्गणी जमा करून हे पैसे आणले आहेत’

निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील माकणी गावचे सरपंच राहुल माकणीकर यांनी तहसीलदारांवर पैसे फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचनामे न केल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केले. या घटनेनंतर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून, जोपर्यंत सरपंचाला अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात तीन ते चार फूट पाणी साचल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आणि पीक नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याच पार्श्वभूमीवर, माकणी गावचे सरपंच राहुल माकणीकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना जाब विचारला. ‘सरकारला भीक लागली आहे, आम्ही ग्रामस्थांकडून वर्गणी जमा करून हे पैसे आणले आहेत,’ असे म्हणत त्यांनी १० आणि २० रुपयांच्या नोटांची बंडले तहसीलदारांच्या अंगावर फेकली. यातील अर्धे पैसे मुख्यमंत्र्यांनी आणि अर्धे पैसे महसूल विभागाने वाटून घ्यावेत, असेही ते म्हणाले.

सरपंचांचा पवित्रा आणि महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलनपैसे फेकल्यानंतर, ‘माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला काहीच फरक पडत नाही,’ असे म्हणत सरपंच माकणीकर स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मोर्चा काढला आणि निवेदन दिले. निवेदनात, जोपर्यंत राहुल माकणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ५४ तलाठी, ५ नायब तहसीलदार, ९ मंडळ अधिकारी, १२ महसूल कर्मचारी, ४४ कोतवाल आणि ६ शिपाई यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या तहसीलदारावरच अन्याय झाला आणि त्यांनीच न्याय मागण्यासाठी मोर्चा काढण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Sarpanch Throws Money at Tehsildar Over Unassessed Crop Damage

Web Summary : Enraged by unassessed crop damage, a Latur Sarpanch threw money at the Tehsildar, sparking protests. Revenue staff demand arrest, halting work.
टॅग्स :laturलातूरfloodपूरFarmerशेतकरी