शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

Latur: बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका; अंतिम टप्प्यात होतील नावे घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:45 IST

दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत.

लातूर : जिल्ह्यातील चार नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी सहा दिवस शिल्लक आहेत. अजूनही भाजपा, काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम टप्प्यात नावे घोषित केली जातील, अशी शक्यता आहे.

उदगीर नगरपालिकेत महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी केली आहे. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. निलंगा नगरपालिकेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पक्षनिरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक आपापल्या वार्डात कामाला लागले आहेत. तर काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचे दोन गट पडले असून दोघांनीही इच्छुकांच्या याद्या तयार केल्या आहेत. याशिवाय, इतर राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे.

औशात महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लढत होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही तयारी केली जात आहे. आ. अभिमन्यू पवार यांच्यासह भाजपाने यंदा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. उदगीर, निलंगा, अहमदपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयात रांगा...अहमदपूर नगरपालिका निवडणुकीसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या भेटीसाठी राेजच रांगा लागत आहे. भाजपानेही मुलाखतींचा सपाटा लावला आहे. याशिवाय, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांनीही स्वतंत्रपणे तयारी चालविली आहे. रेणापूर नगरपंचायतीत भाजपाचे आ. रमेश कराड व काँग्रेसकडून माजी आ. धीरज देशमुख समर्थक तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षात बंडखोरी टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली जात आहे.

कुठे किती जागा...उदगीर ४०निलंगा २३अहमदपूर २५औसा २३रेणापूर नगर पंचायत १७

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Political parties cautious to avoid rebellion; names declared in last phase.

Web Summary : Latur municipal elections see parties delaying candidate announcements to prevent rebellion. Key parties are holding interviews. All eyes are on Udgir, Nilanga, Ausa, and Ahmedpur, where many candidates are vying for positions. Political groups are strategizing to avoid internal conflicts.
टॅग्स :laturलातूरElectionनिवडणूक 2024