शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला, 11 कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 18:41 IST

वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे शहर अंधारात असून, जवळपास ११ कोटींची थकबाकी मनपाकडे आहे.

लातूर : वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे शहर अंधारात असून, जवळपास ११ कोटींची थकबाकी मनपाकडे आहे. चालू महिन्याचे २१ लाखांचे बिलही थकले आहे. मुदतीत बिल न भरल्यामुळे महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.लातूर मनपाकडे २०११ पूर्वीचे ९ कोटी रुपये वीजबिल थकित असून, एकूण ११ कोटी रुपये वीजबिलाचे थकले आहेत. दरमहा स्ट्रीट लाईटचे साधारणपणे २० ते २१ लाख वीजबिल येते. तर कार्यालय व अन्य कनेक्शनचे ४ ते ५ लाखांचे वीजबिल येते. २०११ पूर्वीचे स्ट्रीट लाईटचे ९ कोटी रुपये थकले आहेत. या थकबाकीचा भरणा करण्यासाठी मनपा व महावितरणमध्ये करार होऊन दरमहा १८ लाखांचा हप्ता करून देण्यात आला आहे. मात्र करारानुसार हप्ता भरला जात नाही. शिवाय, चालू बिलही थकविले जात आहे. त्यामुळे महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील शिवाजी चौक, खाडगाव रोड, गावभाग, बार्शी रोड, गंजगोलाई परिसर, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, औसा-अंबाजोगाई रोड परिसरातील पथदिवे मंगळवारी रात्रीपासून बंद आहेत. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचारी व सफाई कामगारांचे वेतनही नियमित होत नाही. त्यातच वसुली मोहीमही थंडावली आहे. त्यामुळे वीजबिल भरणा करावा की कर्मचाºयांचा पगार करावा, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर आहे. उत्पन्नाचे स्त्रोत मजबूत नसल्यामुळे दर महिन्याला ही समस्या उद्भवत आहे. वीजपुरवठा खंडित करून २४ तास उलटले तरी तडजोड झाली नव्हती. महावितरणही वीजबिलासाठी अडून बसल्याने मंगळवार आणि बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली.पाणीपुरवठा योजनेचीही थकबाकी...पाटबंधारे विभागाच्या मांजरा प्रकल्पावरून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचीही थकबाकी मनपाकडे आहे. २ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी २० जानेवारीपर्यंत भरावी; अन्यथा सिंचन कायदा १९७६ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे पत्र लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता आर. एन. क्षीरसागर यांनी लातूर मनपाला पाठविले आहे. महावितरणची आणि पाटबंधारे विभागाच्या थकबाकीमुळे मनपाची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :laturलातूर