शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपाचा कुष्ठरुग्णांना मदतीचा हात; उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपयांचे कवच!

By हणमंत गायकवाड | Updated: March 15, 2023 17:20 IST

दिव्यांग व्यक्तींना चलनवलन साहित्य देण्यासाठीही लाखोंची तरतूद करण्यात आली आहे

लातूर : उदरनिर्वाहासाठी कुष्ठरुग्णांना दुसऱ्यापुढे हात पसरण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. त्यामुळे लातूर महापालिकेने सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे केला आहे. दिव्यांगांना दर महिन्याला प्रत्येकी तीन हजार रुपये अनुदान दिले जात असून, ४४ कुष्ठरुग्ण मनपाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, एकूण महसुली उत्पन्नाचा बांधील खर्च वजा जाता शिल्लक रकमेतील ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींवर खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार लातूर मनपाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७६ लाख रुपयांची तरतूद दिव्यांगांसाठी केली. या योजनेतूनच कुष्ठरुग्णांना अनुदान देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आहे. मनपा हद्दीतील ४४ कुष्ठरोग्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जात आहेत. औषधोपचाराचेही विशेष धोरण लातूर मनपाने हाती घेतले आहे. या योजनेमुळे कुष्ठरुग्णांच्या जीवनात नवी पहाट उजाडली आहे. कुष्ठरुणांना अनुदान देण्यासाठी लातूर मनपा दर महिन्याला एक लाख बत्तीस हजार रुपये खर्च करत आहे.

चलनवलन साहित्यासाठी पंधरा हजार रुपये अनुदान...दिव्यांगांच्या विकासासाठी लातूर महानगरपालिका चलनवलन साहित्य देण्याचाही उपक्रम राबवित आहे. या साहित्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अनुदान दिले जाते. या आर्थिक वर्षामध्ये ४१४ दिव्यांग व्यक्तींना हे अनुदान देण्यात आले आहे. व्हीलचेअर, स्कुटी, तीनचाकी सायकल, काठी आदी चलनवलन साहित्य देण्यासाठी कोटेशन दिल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना पंधरा हजार रुपये अनुदान दिले जात आहे. ४१४ जणांना गतवर्षी प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे ६२ लाख १० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

दिव्यांगाच्या विवाहासाठीही १५ हजार रुपये अनुदान...कुष्ठरोगी, दिव्यांग व्यक्तींच्या उदरनिर्वाह अन् विकासासाठी लातूर मनपाने विशेष धोरण आखलेले आहे. दिव्यांगाच्या विवाहासाठी पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाते. २०२२ या आर्थिक वर्षामध्ये दिव्यांगांच्या तीन विवाह सोहळ्यांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण ४५ हजार रुपये अनुदान दिल्याचे लातूर मनपातील रुकमाजी वडगावे यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती योजनेला मात्र प्रतिसाद नाही...लातूर महानगरपालिकेकडून दिव्यांगांच्या शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनाही राबविली जाते. मात्र, अत्यल्प शिष्यवृत्ती असल्यामुळे अर्ज आले नाहीत. त्यामुळे या योजनेत गेल्या आर्थिक वर्षांमध्ये एकाही दिव्यांग विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचे वाटप झालेले नाही. या योजनेत वर्षाला केवळ एक हजार रुपये शिष्यवृत्ती आहे. त्यामुळेच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच या योजनेतील रक्कम वाढविण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य