शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Latur: मृतावस्थेत आढळला माेर; मात्र, ठसे बिबट्याचे नाहीत, रेणापूर तालुक्यातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: December 17, 2024 22:42 IST

Latur News: भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे.

- राजकुमार जाेंधळे लातूर - भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे. मात्र, आढळून आलेले ठसे हे बिबट्याचे नसल्याचे स्पष्टीकरण रेणापूर तालुका वनपरिमंडळाधिकारी पी. टी. देवकरण यांनी दिले आहे.

भंडारवाडी शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रेणा मध्यम प्रकल्पाच्या खालील बाजूस तुकाराम मामडगे यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचे एका शेतकऱ्याने गावात येऊन मंगळवारी सकाळी सांगितले. या माहितीनंतर गावातील तरुण मंडळींनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली असता, तेथे अर्धवट खालेला मोर आणि ठसे दिसून आले. या ठशांचे त्यांनी छायाचित्र काढले. या घटनेची गावात मोठी चर्चा झाली. परिणामी, भंडारवाडी परिसरात शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती आमदार रमेश कराड यांना देण्यात आली. त्यांनी नागपूर येथून तातडीने जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी पोटे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. तातडीने स्थळपाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रेणापूर तालुका वनपरिमंडळाधिकारी पी. टी. देवकरण यांच्यासह वनरक्षक टी. ए. डिगोळे, बी. के. मुंडे, सतीश कांबळे, विठोबा शिंदे हे घटनास्थळी मंगळवारी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. ठसे अस्पष्ट असल्याचे दिसून आले. हे ठसे बिबट्याचे नसल्याची खात्री पटली. अर्धवट खालेला मोर वनाधिकाऱ्यांनी रेणापूर येथे घेऊन गेला आणि त्याची उत्तरीय तपासणी केली.

बिबट्याचे ठसे नाहीत; शेतकऱ्यांनी घाबरू नये...भंडारवाडी शिवारातील घटनास्थळी मंगळवारी आम्ही भेट देऊन पाहणी केली असून, रेणापूर तालुक्यात पाच ते सहा ठिकाणी बिबट्या असल्याची माहिती मिळाली. तेथेही आम्ही भेटी देत पाहणी केली आहे. मात्र, कुठेही आम्हाला बिबट्याची ठसे आढळून आले नाहीत.- पी. टी. देवकरण, परिमंडळाधिकारी, रेणापूर

बिबट्याची दशहत; शेतकऱ्यांमध्ये चिंता...भंडारवाडी परिसरात बिबट्या आढळल्याचे शेतकऱ्यांनी संतोष नागरगोजे यांना कळविले. त्यांनी याबाबत वनविभागाचे अधिकारी, तलाठी, शेतकऱ्यांना सोबत घेत त्या शेतकऱ्याची भेट घेतली. शेतकऱ्यांना सावध राहण्याबाबत सूचना केल्या. यावेळी शेतकरी म्हणाले, आम्ही रोज जीव मुठीत घेऊन शेतात पाणी देत आहाेत. आम्हाला रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्याला बिबट्याची दशहत असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे.

टॅग्स :laturलातूर