लातूर : शहरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. पुलावरून खाली पडल्याने एका ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे हा उड्डाणपूल आता ''सुसाइड स्पॉट'' बनत चालला आहे की काय, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एक ६१ वर्षीय पुरुष या उड्डाणपुलावरून खाली कोसळला. पुलावरून खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या वृद्धाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हा मृत्यू केवळ अपघात नसून त्या व्यक्तीने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. यापूर्वीदेखील याच पुलावरून उडी घेऊन काहींनी आपले आयुष्य संपवले आहे, तर काही वाहने पुलावरून खाली कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.
प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष..!उड्डाणपुलावर तरुण आणि मध्यमवयीन लोक तासन्तास थांबलेले असतात, जणू काही हा उड्डाण पूल एखादा ''पिकनिक स्पॉट'' झाला आहे. अशा गर्दीमुळे आणि पुलाच्या कमी उंचीच्या कठड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. या ठिकाणी तातडीने संरक्षक जाळ्या आणि सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अन्यथा अजून किती निष्पापांचे बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
Web Summary : Latur's flyover is becoming a suicide spot. A 61-year-old man died after falling from it. Locals fear increasing incidents, demanding better safety measures like CCTV and protective nets due to administrative negligence.
Web Summary : लातूर का फ्लाईओवर आत्महत्या स्थल बनता जा रहा है। 61 वर्षीय व्यक्ति की गिरने से मौत हो गई। स्थानीय लोग बढ़ती घटनाओं से भयभीत हैं, सीसीटीवी और सुरक्षा जाल जैसे बेहतर सुरक्षा उपायों की मांग कर रहे हैं।