शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:55 IST

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे.

लातूर : शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी महसूल आणि खासगी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी गुरुवारी रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथे आले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवित त्यांना परत पाठविले.

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. गुरुवारी रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथे रेणापूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोनार्क प्रा.लि. कंपनीचे अधिकारी सीमांकन करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. बाधित शेतकऱ्यांनी त्यास विरोध करीत गावशिवारात कुठल्याही प्रकारचे सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला.

कुठल्याही परिस्थितीत रेणापूर आणि अंबाजोगाई तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतावर येऊ देणार नाही, असा इशारा दिला. शेतकऱ्यांचा विरोध पाहता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी बाधित शेतकरी समितीचे गजेंद्र येळकर, आत्माराम माने, संजय माने, बालाजी हाके, नीळकंठ भिसे, ॲड. दिलीपराव कुलकर्णी, प्रकाश चव्हाण, रामेश्वर चव्हाण, श्रीकिशन मेटे, सतीश भिसे, शिवराज माने, उपसरपंच नवनाथ माने यांच्यासह चाडगाव, मोरवड, भोकरंबा, मोटेगाव, नांदगाव, सायगाव, भारज या गावांतील बाधित शेतकरीही उपस्थित होते.

आमचा कायमचा विरोधचाडगावहून मोरवड, नांदगाव या गावांना कॅनॉलद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी नेले जाते. या जमिनी बागायती असल्याने शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे, असे गजेंद्र येळकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरMarathwadaमराठवाडाShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग