शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर विभागाचा बारावीचा ८६.०८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:07 IST

निकालात लातूर जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद पिछाडीवर 

ठळक मुद्दे८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

लातूर : बारावीच्या परीक्षेस लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८६़.०८ टक्के लागला असून, परीक्षेला सामोरे गेलेल्या ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांपैकी ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २़२३ टक्क्यांनी लातूर विभागाचा निकाल घसरला आहे. दरम्यान मंडळात लातूर जिल्हा अव्वल स्थानी असून नांदेड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून ८६ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले पैकी ७३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९३़०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १० हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले. पैकी ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२़०३ टक्के लागला आहे. तर कला शाखेतून ३४ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी २६ हजार ८९३ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ७८.४४ टक्के लागला आहे. व्होकेशनलमधून ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३०  उत्तीर्ण झाले असून, या विभागाचा निकाल ७४.६९ टक्के लागला आहे.

लातूर मंडळांतर्गत लातूर जिल्ह्यातून ३४ हजार २४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३१ हजार ७० उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८६़.२० टक्के लागला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार ६५९ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १२ हजार ९५३ उत्तीर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२़.७२ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र